Random Video

संकल्प... धरणग्रस्तांच्या बामनोलीतील घरात ज्ञानाचा दिवा लावण्याचा | Library | Diwali | Book | Sakal

2021-04-28 1,005 Dailymotion

सांगली : कोयना धरणग्रस्तांची पुनर्वसित वसाहत म्हणजे कुपवाडजवळचं बामनोली गाव. इथलं प्रत्येक घर ज्ञानप्रकाशाने उजळावे यासाठी लोकमान्य टिळकांच्या नावाने नुकतेच वाचनालय आणि अभ्यासिका सुरु झाली. त्यासाठी चाळीस लाखांचे कर्ज काढून टुमदार अशी उभी राहिलेली इमारत लोकमान्यांच्या रत्नांगिरीच्या घराची प्रतिकृती आहे. धरणग्रस्ताच्या कुटुंबातील तिसऱ्या पिढीचे सदस्य असलेल्या विनय देशपांडे यांनी गावपांढरीचे ऋण फेडण्यासाठी असं धाडस केलं आहे. कोयना धरणाने महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाला. मात्र ज्यांनी या धरणासाठी गावपांढरीवर तुळशीपत्र ठेवले त्यांच्या वाट्याला मात्र अंधारच आला. अशांपैकीच एक विस्थापिताचं बामनोली गाव. 1962 मध्ये हे गाव वसलं. मात्र यातल्या बहुतांशी कुटुंबांना शहराचे वारे मानवले नाही. ती शिक्षणापासून दुरावली. जमीनी फुकून गेल्या. परिस्थितीच्या रेट्याने आज बामनोलीतील अनेक मुलं शेजारच्या एमआयडीसीत रोजगाराला जाताना दिसतात. गावतील इर्षा वादात पहिल्या दोन पिढ्या खपल्या. हे सारं एका अविद्येने झाले...हे पाहतच देशपांडे कुटुंबातील विनय मोठे झाले. त्यांचे वडील नारायण जीवन प्राधिकरणमधून निवृत्त झाले. त्या नोकरीमुळे त्यांना त्यांची बहिण प्रियंका यांना शिक्षणाची संधी मिळाली. स्वतः विनय यांनीही सांगलीत स्थायिक होत चांगलं जीवन प्राप्त केलं.

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.